त्या बालकांच्या मृत्यूचं राजकारण करणं दुर्देवी | किशोरी पेडणेकर

2021-12-24 0

#KishoriPednekar #BmcSavitribaiPhuleHospital #MayorKishoriPednekar
भांडुपच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात चार बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑगस्ट ते 23 डिसेंबर पर्यंत 268 बालकांना सावित्रीबाई फुले रूग्णालयात दाखल केलं गेलं होतं. त्या पैकी 234 मुलांना वाचवण्यात यश आलं आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस रुग्णालयाच्या कारभारावर बोट दाखवणं योग्य नाही असं पेडणेकर म्हणाल्यात. त्या मुलांचा मृत्यू झाला हे दुर्देवी आहे. मात्र यावरून होणारं राजकारण हे आणखी दुर्देवी आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. त्या मुलांचं जन्मजात वजन हे दोन किलोंपेक्षा कमी होतं,त्यांची प्रकृती चिंताजनक होती असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या

Videos similaires